पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

शिखांचे दहावे गुरु, श्री  गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. श्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'धर्मगुरू होते त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ "गुरू ग्रंथ साहिब" चे संकलन आणि लिखाण केले.

नवी दिल्ली: शिखांचे दहावे गुरु, श्री  गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. श्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'धर्मगुरू होते त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ "गुरू ग्रंथ साहिब" चे संकलन आणि लिखाण केले. गुरु गोविंद सिंह यांनी  'सब सिखन को हुकूम है, गुरु मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरु ग्रंथ साहिब लाच आपला गुरु माना) असा संदेश त्यांनी लोकांना दिला.

शिखांचे दहावे गुरु, श्री  गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं आदरांजली वाहिली. गुरु गोविंद सिंहा यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि आयुष्यभर ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिल्याचं पंतप्रधानांनी सागितलं. प्रेम, ऐक्य, बंधुतेचा संदेश त्यांनी नेहमीच दिला.

"श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या  पुण्यतिथीनिमित्त या प्रकाश पर्वाच्या पवित्र क्षणी  मी त्यांना नमन करतो. त्यांनी आपले जीवन न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी  समर्पित केले होते. जेव्हा त्यांनी आपल्या तत्त्वांचे समर्थन करत ते नेहमी आपल्चया तत्वांवर ठाम होते.त्यांच्या धैर्याचे आणि त्यांच्या त्यागाचे आम्ही स्मरण करतो." अस ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं.

संबंधित बातम्या