पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक  लसीचा पहिला डोस घेतला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक  लसीचा पहिला डोस घेतला. राजधानी दिल्लीस्थित अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) मध्ये सकाळी पंतप्रधान मोदी यांचं लसीकरण करण्यात आलं. विषाणूपासून बचाव करण्यासाठी 1 मार्चपासून देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनाही लस दिली गेली.

ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान मोदींची केली स्तुती

स्वत: पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "मी एम्समध्ये कोरोना लसीचा माझा पहिला डोस घेतला. कोरोना विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी युद्धपातळीवर काम केले. जे लोक लस घेण्यास पात्र आहेत त्यांना मी लसी घेण्याचं आवाहन करतो. आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त करायचा आहे." प्रसार भारती न्यूज सर्व्हिसच्या ट्विटनुसार पुडुचेरीची रहिवासी सिस्टर पी. निवेदा यांनी पंतप्रधानांना भारत बायोटेक निर्मित Covaxin लस दिली. 

''केंद्राने बनवलेले कायदे हे शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट''

दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण आजपासून सुरू 

60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांपुढील पण आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. शासकीय केंद्रांकडून कोरोना विषाणूची लस मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, खासगी दवाखान्यांमध्ये लसीकरणासाठी काही शुल्क आकारण्यात येणार आहे. काही देशांमध्ये सापडलेले कोरोनाचे नवीन प्रकार लक्षात घेता केंद्राने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनाही इशारा दिला,की हलगर्जीपणा परिस्थितीला गंभीर बनवू शकतो. दुसऱ्या टप्प्यात 10 हजार सरकारी केंद्रांवर लोकांना मोफत लस दिली जाईल. 20 हजार खासगी दवाखाने व केंद्रांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या खाजगी दवाखान्यांमध्ये लसीकरणासाठी नागरिकांकडून काही प्रमाणात शुल्क आकारले जाणार आहे. आत्तापर्यंत 1.23 कोटीाहून अधिक कोरोना योद्ध्यांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

संबंधित बातम्या