‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला जोडणाऱ्या रेल्वेंचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांतून केवडिया, गुजरातला जोडणार्‍या आठ रेल्वे गाड्यांचे उद्घाटन करतील.

केवडिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांतून केवडिया, गुजरातला जोडणार्‍या आठ रेल्वे गाड्यांचे उद्घाटन करतील. केवडिया स्टेशन हे ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन असलेले भारताचे पहिले रेल्वे स्टेशन आहे.

गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना सकाळी ११ वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या रेल्वे केवडियाला (स्टॅच्यू ऑफ यूनिटी) वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई, वाराणसी, दादर, अहमदाबाद, आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत. या रेल्वे गाड्यांमुळे ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला पर्यंत पर्यटकांना सहजतेने पोहोचता येणार आहे.

संबंधित बातम्या