" 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'हून 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची लोकप्रियता जास्त "

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांतून केवडिया, गुजरातला जोडणार्‍या आठ रेल्वे गाड्यांचे उद्घाटन केलं.

केवाडिया :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांतून केवडिया, गुजरातला जोडणार्‍या आठ रेल्वे गाड्यांचे उद्घाटन केलं. केवडिया स्टेशन हे ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन असलेले भारताचे पहिले रेल्वे स्टेशन आहे.

कृषी कायद्यांच्या समितीवर नव्या सदस्यांच्या नेमणूकीची मागणी 

गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना सकाळी ११ वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या रेल्वे केवडियाला (स्टॅच्यू ऑफ यूनिटी) वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई, वाराणसी, दादर, अहमदाबाद, आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत. या रेल्वे गाड्यांमुळे ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला पर्यंत पर्यटकांना सहजतेने पोहोचता येणार आहे.

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी केली पीएम केअर फंडाच्या हिशोबाची मागणी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणाले की, रेल्वेच्या इतिहासात कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल जेंव्हा देशाच्या वेगवेगळ्या भागांतून एकाच ठिकाणासाठी एवढ्यारेल्वे गाड्यांचं उद्घटन होत असेल. देशाला एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र देणाऱ्या सरदार पटेलांच्या सर्वांत उंच प्रतिमेमुळे केवाडियाचा विशेष ओळख बनली आहे. या रेल्वे कनेक्टिविटीमुळे तिथल्या आदिवासी लोकांचं आयुष्य देखील सुखकर होणार आहे. 

Corona Update : देशात गेल्या 24 तासात 15,144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून अधिक पर्यटक इथे येत आहेत. लोकार्पणानंतर जवळपास 50 लाख लोकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलेली आहे. यासोबतच केवाडियामध्ये रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. रेल्वेमध्ये नव्या विचारांसह, नव्या तंत्रज्ञानासह काम चालू आहे. भारतीय रेल्वेमध्ये देखील सरदार पटेलांच्या स्वप्नांचा संगम आहे, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

 

या मार्गाच्या रेल्वेंना पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

  • 09103/04 केवाडिया-वाराणसी महामना एक्सप्रेस (साप्ताहिक)
  • 2927/28 दादर-केवाडिया एक्सप्रेस (दैनिक)
  • 09247/48 अहमदाबाद-केवाडिया जनशताब्दी एक्सप्रेस (दैनिक)
  • 09145/46 निजामुद्दीन-केवाडिया संपर्क क्रांती एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
  • 09105/06 केवाडिया-रीवा एक्सप्रेस (साप्ताहिक)
  • 09119/20 चेन्नई-केवाडिया एक्सप्रेस (साप्ताहिक)
  • 09107/08 प्रतापनगर-केवाडिया मेमू ट्रेन (दैनिक)
  • 09109/10 केवाडिया-प्रतापनगर मेमू ट्रेन (दैनिक)

 

 

 

संबंधित बातम्या