'वन नेशन, वन कार्ड’ उद्यापासून येणार..पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

वॉलेटमध्ये वेगवेगळी कार्डे वापरणे सर्वांसाठीच मोठे जिकरीचे असते, बऱ्याचदा हे ओझे वाहताना ते हरवण्याचाही धोका असतो. आता या समस्येवर नवा तोडगा मिळणार आहे.

नवी दिल्ली :  वॉलेटमध्ये वेगवेगळी कार्डे वापरणे सर्वांसाठीच मोठे जिकरीचे असते, बऱ्याचदा हे ओझे वाहताना ते हरवण्याचाही धोका असतो. आता या समस्येवर नवा तोडगा मिळणार आहे. आणखी ४८ तासांनी अस्तित्वात येणारे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हा त्यावरील प्रभावी उपाय ठरू शकतो.  डेबिट व क्रेडिट कार्डाच्या लिंकच्या साहाय्याने वापरता येणारे हे कार्ड एटीएमसह रेल्वे, मेट्रो, शॉपिंग मॉल टोल नाके व बस सेवेसह अन्य अनेक सेवांसाठी वापरले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (२८ डिसेंबर) या योजनेला प्रारंभ होईल याच कार्यक्रमात ते दिल्लीतील पहिल्या विनाचालक मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवतील. भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडने ‘ऑटोमॅटिक फेयर कलेक्‍शन सिस्टिम (स्वागत) च्या सहकार्याने हे ‘वन नेशन, वन कार्ड’ अस्तित्वात आणले आहे. 

संबंधित बातम्या