आषाढ पौर्णिमा कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार

PIB
शनिवार, 4 जुलै 2020

4 जुलैचा हा कार्यक्रम जगभरातले 30 लाख लोक लाईव वेबकास्ट द्वारे अनुभवतील अशी अपेक्षा आहे.

मुंबई,

केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ 4 जुलै 2020 ला आषाढ पौर्णिमा, धर्म चक्र दिन म्हणून साजरी करत आहे. या दिवशी बुद्धांनी पहिल्या पाच तपस्वी शिष्यांना उत्तर प्रदेशात वाराणसीजवळ सारनाथ इथे, सध्याचे  डीअर पार्क, ऋषीपटण इथे पहिला उपदेश केला होता. जगभरातले बौध्द हा दिवस धर्म चक्रपरवत्तना किंवा धर्म चक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करतात.

आपल्या गुरु प्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी  बौद्ध आणि हिंदू हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतात. बुद्धांचे आत्मज्ञान, धर्म चक्र परिवर्तन आणि महापरीनिर्वाण भूमी हा भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि त्याच्या अनुषगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रपती भवनातून धर्म चक्र दिनाचे उद्घाटन करतील. भगवान बुद्धांची शांतता आणि न्याय यांची शिकवण  तसेच अष्टांग मार्ग यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे संबोधित करतील. सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्य मंत्री किरेन रीजीजू  उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करतील. मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे विशेष भाषण यावेळी वाचून दाखवण्यात येईल तसेच मूळ भारतीय मौल्यवान बौद्ध हस्तलिखित शतकांपासून मंगोलियात जतन करण्यात आले आहे ते राष्ट्रपतींना सादर करण्यात येईल.

याशिवाय जगभरातले बौद्ध  धार्मिक नेते, विद्वान यांचे संदेश सारनाथ आणि बोधगया इथून दाखवण्यात येतील.

कोविड-19 महामारीमुळे, संपूर्ण कार्यक्रम, यावर्षीच्या 7 मे रोजी झालेल्या यशस्वी आभासी वेसाक (बुद्ध पौर्णिमा) कार्यक्रमाप्रमाणेच आभासी पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या