पंतप्रधान उद्या वाराणसीतील संस्था प्रतिनिधींशी संवाद साधणार

pib
बुधवार, 8 जुलै 2020

या संस्था शिक्षण, सामाजिक, धार्मिक, आरोग्य, हॉटेल्स / सामाजिक क्लब आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रात सेवा देतात.

नवी दिल्ली, 

 कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदी दरम्यान,वाराणसीतील रहिवासी आणि सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी स्वत: च्या प्रयत्नांद्वारे तसेच जिल्हा प्रशासनाला मदत देऊन गरजूना वेळेवर अन्न उपलब्ध होईल हे सुनिश्चित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांच्या अनुभवाविषयी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे प्रयत्न जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील.

टाळेबंदी दरम्यान, वाराणसीतील शंभराहून अधिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या अन्न वितरण केंद्राद्वारे तसेच वैयक्तिक प्रयत्नांद्वारे सुमारे 20 लाख भोजन पॅकेट्स आणि 2 लाख कोरडा शिधा किटचे वितरण केले.

अन्न वितरणाव्यतिरिक्त या संस्थांनी मास्क, सॅनिटायझर्स इत्यादीच्या वितरणात मोलाचे योगदान दिले. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरविण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या