''पंतप्रधान साहेब तुम्ही फोन करा म्हणजे दिल्लीला ऑक्सिजन मिळेल"

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

चौथ्या टप्यात 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. 

चौथ्या टप्यात 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने राज्ये देखील लस खरेदी करु शकतात असे सांगितले आहे. केंद्राला 150 रुपये आणि राज्याला 400 रुपयेला लस मिळणार आहे. लसीचा दर समान असावा. एकाच देशातील लसीची किंमत वेगवेगळी कशी असू शकते. 'एक देश एक किंमत' असावी अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. मागच्या २४ तासात दिल्लीमध्ये 26,169 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. (Prime Minister, you call so that Delhi can get oxygen)

होम आयसोलेशनमध्ये ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने दिल्या खास...

पंतप्रधान महोदय, कृपया तुम्ही फोन करा जेणेकरुन ऑक्सिजन दिल्लीला पोहोचेल. असे ऑक्सिजनच्या संकटाविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीत म्हणाले. दिल्लीत ऑक्सिजन कारखाना नाहीये म्हणजे दिल्लीतील 2 कोटी लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही का? दिल्लीत कारखाना नसेल तर ज्या राज्यात ते आहे ते देणार नाहीत का?. जर काही राज्यांनी दिल्लीच्या वाट्याला येणार ऑक्सिजन थांबविला असेल तर मी केंद्रात फोन करून कोणाशी बोलू? असे अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी कोरोना बैठक बोलावली. आम्ही दिल्लीच्या जनतेच्या वतीने हात जोडून आवाहन करीत आहोत की कठोर पावले उचलली नाहीत तर मोठी शोकांतिका घडू शकते. अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी मोंदीकडे मागणी केली आहे. 

आम्हला सर्वात मोठी ऑक्सिजनची समस्या भेडसावत आहे. दिल्लीकडे येणारे ऑक्सिजन ट्रक्स थांबवले जात आहेत. कृपया राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोला जेणेकरुन ऑक्सिजन दिल्ली पर्यंत पोहोचू शकेल. लोक खूप संकटात आहेत. गोष्टी बघवाल्या जात नाही एवढी वाईट परिथिती आहे, अशी केजरीवालांनी हळहळ व्यक्त केली. पुढे ते म्हणाले  ''मी दिल्लीचा मुख्यमंत्री असूनही मी माझ्या राज्यासाठी काहीही करू शकत नाही. ऑक्सिजनचे सर्व प्लांट मोदींनी केंद्राच्या अखत्यारीत घ्यावे आणि हे सर्व ट्रक आर्मीच्या निगराणी खाली राज्यांपर्यंत पोहोचावे. जेणे करून मधेच त्याला कोणते राज्य अडवणार नाही. दिल्लीला सध्या 700 टन ऑक्सिजनची गरज आहे. अगोदर केंद्र सरकार दिल्लीला 350 टॅन ऑक्सिजन पुरवत होते. परंतू रात्रीपासून तो कोटा 480 टन केला आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. 

 

संबंधित बातम्या