Tauktae Cyclone: पंतप्रधानांची गुजरातला 1000 कोटींची आर्थिक मदत

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

गोव्यासह (Goa) इतप राज्य मदतीच्या प्रतिक्षेत 

गुजरात: तोक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांची अहमदाबादमध्ये अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याआधी पंतप्रधानांनी गुजरात आणि दीवमधील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाचे हवाई सर्वेक्षण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी थेट दिल्लीहून भावनानगरला पोहोचले. येथे त्यांनी चक्रीवादळाने बाधित झालेल्या क्षेत्रांची हवाई पाहणी केली. या वादळामुळे आतापर्यंत 45 लोकांचा मृत्यू झाला आहे.(Prime Minister's financial assistance of Rs 1000 crore to Gujarat)

Black Fungus: राजस्थानात महामारी म्हणून घोषित 

मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी बोलले आणि चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसान आणि बाकी परिस्थितीचा आढावा घेतला. कारण सोमवारी रात्री वादळामुळे दरड कोसळली होती. 125 किमी प्रति तास वेगाने वारा अजूनही वाहत आहे. या वादळाचा परिणाम उत्तर भारतातील बर्‍याच भागात दिसून आला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या अनेक भागात पाऊस पडत आहे.

तीनशे पेक्षा जास्त कोरोना बाधितांबवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्याचा...

किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान
गुजरातमध्ये चक्रीवादळाने कहर केला आहे. येथे आतापर्यंत 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानंतर सरकार भरपाई देईल. गुजरातमध्ये विजेचे खांब व झाडे उपटून पडली आहेत आणि बरीच घरे व रस्ते खराब झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की ''चक्रीवादळामुळे 16,000 हून अधिक घरे खराब झाली आहेत, तर 40 हजाराहून अधिक झाडे आणि एक हजाराहून अधिक विद्युत खांब उखडून पडले आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की ''या वादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. चक्रीय वादळामध्ये आता बदल झाला आहे. जसे-जसे वादळ उत्तरेकडे जाईल तसे चक्रीवादळाचा दबाव कमी होईल''.  राज्यातील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस झाला आणि सुमारे 35 तालुक्यात 1 इंचापेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

गोव्यासह (Goa) इतप राज्य मदतीच्या प्रतिक्षेत 
गुजरात बरोबर गोवा, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना देखील चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 कोटींची मदत केली आहे. तसेच मोदी गोवा, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना मदत करणार का? असे विरोधक प्रश्न विचारत आहेत. गोव्यामध्ये वादळाने 40 कोटींचे, तर महाराष्ट्रयामध्ये जवळपास 100 कोटीचे नुकसान झाले आहे. या राज्यांना मोदी सरकार कधी मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.   

 

संबंधित बातम्या