पंतप्रधानाच्या बैठकीमुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या मनात विकासाची पालवी 

jammu 1.jpg
jammu 1.jpg

जम्मू काश्मीरमधून (Jammu and Kashmir) कलम 370 हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यातील 8 प्रमुख राजकीय पक्षांच्या 14 नेत्यांसोबत चर्चा केली. जवळपास साडेतीन तास चालेल्या  या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधानांच्या बैठकीमुळे येथील नागरीकांच्या मनात विकासाची नवीन पालवी फुटली आहे. 

या बैठकीत जम्मू काश्मीरच्या अनेक मुद्द्यांवरती सविस्तरपणे चर्चा करण्यात आली असून येथे लवकरच निवडणुका घेण्यात येतील. तसेच काश्मीरला पूर्ण राज्य देण्याच्या मागणीवर पंतप्रधानांनी नेत्यांना विश्वास दिला असल्याचही समोर येत आहे. 

या सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah), महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एनएसए अजित डोवाल (Ajit Doval), केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. (The Prime Ministers meeting fostered development in the minds of the people of Jammu and Kashmir)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बोलताना पंतप्रधान म्हणाले, राजकीय मतभेद होतील पण प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी काम केले पाहिजे. जेणेकरून जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्याचा फायदा होईल. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांची सुरक्षा आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवून आज जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आहेत. कलम 370 हटवल्यानंतर देशातसह जम्मू-काश्मीरमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. कलाम 370 हटवताना संसदेतही अभूतपूर्व गोंडाळ पहिला मिळाला. त्यावेळी राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यापासून ते प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना नजरकैद ठेवण्यापर्यंत देश अनेक घडामोडी घडल्या. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गहृमंत्री अमित शहा यांच्या भेटीने जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या मनात विकासाची आणि आनंदाची नवीन पालवी फुटेल अशी आशा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com