तब्बल 3300 कैदी तिहार जेल मधुन गायब; कोरोनाचे असेही परिणाम

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कोरोनादरम्यान तुरुंगात असलेल्या 5556 न्यायप्रविष्ठ आरोपींना जामीन मंजूर झाला होता, त्यापैकी 3300 न्यायप्रविष्ठ आरोपी अद्याप परत आले नसल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचे कोणत्या गोष्टींवर काय परिणाम होतील याचा अंदाज लावणे सुद्धा आता कठीण झाले आहे. कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती दरम्यान, 1184 वेगवेगळ्या प्रकरणात दोषी असलेल्या  तिहार तुरुंगात असलेल्या कैद्यांना आपत्कालीन पॅरोल  देण्यात आला होता. त्यापैकी 1072 कैदी पुन्हा कारागृहात परतले, तर 112 कैदी अजूनही कारागृहात दाखलच झालेले नाहीत. त्याचप्रमाणे कोरोनादरम्यान तुरुंगात असलेल्या 5556 न्यायप्रविष्ठ आरोपींना जामीन मंजूर झाला होता, त्यापैकी 2200 कैदी जमीन संपण्यापूर्वी परत आले, तर जवळपास 3300 न्यायप्रविष्ठ आरोपी अद्याप परत आले नसल्याचे समोर आले आहे. (Undertrial prisoners released on bail during the Corona period did not return)

माध्यमांना मिळालेल्या माहिती नुसार तिहार जेल (Tihar Jail) मध्ये कोरोना  विषाणूने 60 हून अधिक कैदी (Undertrial prisoners) संक्रमित झाले आहेत, तर 11 कर्मचार्‍यांवर कोरोनाची बाधा झाल्याने उपचार सुरु आहेत. याबाबत बोलवताना तुरुंग प्रशासनाच्या वतीने कैद्यांना झालेल्या कोरोना संक्रमणाच्या आकडेवारीची माहिती दिली. कारागृह महासंचालक संदीप गोयल यांनी आतापर्यंत एकूण 190 कैद्यांना संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट केले.  तर बुधवारपर्यंत दिल्लीच्या तुरूंगात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 78 असल्याचे समजते आहे. यात 11 तुरूंगातील कर्मचार्‍यांचा देखील समावेश आहे. 

भाजपशासित राज्यात कोरोनाची खोटी आकडेवारी? स्मशानभूमीने सत्य आणलं समोर

दरम्यान, गोयल यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार कोरोना संसर्ग (Corona) झालेल्या 190 कैद्यांपैकी 121 कैद्यांवर उपचार सुरु आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 67 उपचार घेणारे रूग्ण आहेत असून आतापर्यंत जेलमधील जवळपास 304 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यापैकी 293 कर्मचारी बरे झाले असून 11 जणांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या