सोनिया गांधींना आव्हान देणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही: सुनील केदार

पीटीआय
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

सोनिया गांधींवर आक्षेप घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

मुंबई: सोनिया गांधींवर आक्षेप घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. तर, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत अशी विनंती करतानाच, त्यांनी आदेश दिला तर, लगेच महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडेल असे म्हटले आहे.

निष्ठेच्या या प्रदर्शनात सुनील केदार यांनी आघाडी घेत गांधींना आव्हान देणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे ट्वीट केले. बड्या नेत्यांना केदार यांनी दिलेले आव्हान हा चर्चेचा विषय झाला.

संबंधित बातम्या