वेळेत कपात केल्याने खासगी शाळा गोंधळात

student
student

नवी दिल्ली

कोविड-१९ मुळे खासगी शाळा ऑनलाइन शिक्षणावर भर देत असताना केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करून मुलांचा पडद्यावरील वेळ कमी करावा असे सांगितले आहे. त्यामुळे खासगी शाळा व्यवस्थापनाला ऑनलाइन शिक्षण देताना त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा होईल आणि त्याचा अपव्यय कसा टाळता येईल यात संतुलन साधाताना गोंधळात पडले आहे. याशिवाय ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेत कपात केल्याने वरच्या वर्गाना नवीन नियम अडचणीचा ठरत असल्याचा सूर शाळांनी काढला आहे.
लॉकडाउनच्या काळात खासगी शाळांकडून नियमित शाळेच्या वेळेप्रमाणे ऑनलाइन क्लास चालवले जात असल्याने पालकांनी तक्रारी केल्या होत्या. कोविड-१९ मुळे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असताना दुसरीकडे मुलांचा स्क्रिन टाइम वाढत असल्याने आरोग्यबाबतच्या तक्रारी येऊ लागल्या. परिणामी दोन दिवसांपूर्वी मनुष्यबळ मंत्रालयाने दखल घेत नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामुळे कमी वेळेत मुलांना कसे शिकवता येईल ? या विचारात खासगी शाळा पडल्या. शालीमार बाग येथील मॉडर्न पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अलका कपूर म्हणाल्या, प्राथमिक वर्गातील मुलांचा वेळ कमी करण्यास हरकत नाही, मात्र मोठ्या वर्गासाठी ही बाब अडचणीची ठरू शकते. लहान वर्गाचा अभ्यासक्रम प्रकल्प आणि सह उपक्रमातून पूर्ण करता येणे शक्य आहे. रेकॉर्डेड क्लिपच्या मदतीने प्राथमिक आणि माध्यमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. एवढेच नाही तर लहान वर्गात शिकणाऱ्या मुलाचे पालकही सहकार्य करत असून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाल्यांना मदत करत आहेत. परंतु वरच्या वर्गातील मुलांचा अभ्यासक्रम व्यापक आणि किचकट असतो. तो सविस्तरपणे शिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे मनुष्यबळ मंत्रालयाने ठरवून दिलेला वेळ वरच्या वर्गांना पुरेसा नाही. वरच्या वर्गासाठी वेळ वाढवून दिला नाही तर वरच्या वर्गातील अभ्यासक्रमाची उजळणी आणि सराव करुन घेताना शिक्षकांची दमछाक होऊ शकते आणि ते विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रासदायक ठरेल. हेरिटेज स्कूलचे सहसंस्थापक मनित जैन म्हणाले की, ऑनलाइनसाठीच्या वेळेचा उपयोग आणि अपव्यय यात फरक करायला हवा.

संपादन - अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com