आता खासगी क्षेत्रात स्थानिकांना मिळणार 75 टक्के आरक्षण; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 2 मार्च 2021

हरियाणा मध्ये राज्यातील खासगी क्षेत्रात युवकांना 75 टक्के नोकरीच्या आरक्षणासंदर्भातील बिलास राज्यपाल सत्यदेव नायरन आर्य यांनी मंजुरी दिली आहे.

हरियाणा मध्ये राज्यातील खासगी क्षेत्रात युवकांना 75 टक्के नोकरीच्या आरक्षणासंदर्भातील बिलास राज्यपाल सत्यदेव नायरन आर्य यांनी मंजुरी दिली आहे. आणि त्यामुळे या बिलाची पुढची प्रक्रिया करण्यात येणार असून, हे विधेयक पुढे जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज सांगितले आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी देखील आज याबाबत माहिती देताना, राज्यपालांनी हरियाणा राज्य रोजगार विषयक स्थानिक उमेदवार कायदा 2020 ला मान्यता दिली असल्याचे सांगितले. आणि त्यानंतर हरियाणातील खासगी क्षेत्रात 75 टक्के नोकर्‍या या राज्यातील युवकांसाठी राखीव राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  

Corona Virus : हरियाणात कोरोनाचा उच्छाद; 78 जणांना कोरोनानं ओढळं जाळ्यात

हरियाणा राज्याच्या विधानसभेमध्ये मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील खासगी नोकरीत युवकांना 75 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी या विधेयकावर मोहोर उठविल्यानंतर, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील जनतेला देण्यात आलेले आश्वासन पूर्ण करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच आता राज्यातील सर्व खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 75 टक्के हे हरियाणातील राहणार असलयाचे त्यांनी म्हणत, सरकारचा भाग झाल्यानंतर अगदी एक वर्षानंतर मंजूर झालेला हा निर्णय आपल्यासाठी भावनिक असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर म्हटले आहे.   

दरम्यान, हरियाणा राज्य रोजगार विषयक स्थानिक उमेदवार कायद्याच्या अध्यादेशाला हरियाणा सरकारच्या मंत्रिमंडळाने मागील वर्षाच्या जुलै मधेच मंजुरी दिली होती. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील खासगी नोकरीत 75 टक्के स्थानिक तरुणांची भरती अनिवार्य करण्यासाठीचा कायदा कॅबिनेट समोर सादर केला होता. आणि त्यानंतर या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती.      

संबंधित बातम्या