'शेतकऱ्यांना देशद्रोही कोणी म्हटले होते'

पंतप्रधान मोदी (Modi government) यांनी तीन्ही कृषी कायदे मागे घेतले असल्याची मोठी घोषणा केली.
'शेतकऱ्यांना देशद्रोही कोणी म्हटले होते'
Priyanka GandhiDainik Gomantak

मागील दीड वर्षापासून मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन आज सफल झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी तीन्ही कृषी कायदे मागे घेतले असल्याची मोठी घोषणा केली. मात्र दुसरीकडे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर कृषी कायद्यावरुन आरोपांची फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे.

प्रियांका यावेळी म्हणाल्या, देशातील शेतकऱ्यांच्या ज्या मूळ समस्या त्या सरकारने सोडविल्या पाहिजे. कृषी कायदे मागे घेणे हे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास नेमका कसा ठेवायचा याचा विचार करावा लागत आहे. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलजीवी आणि देशद्रोही कोणी म्हटले होते? देशात पाच राज्यांच्या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशाची माफी मागण्यासाठी आले आहेत. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला याच मोदी सरकारने केला होता. लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्यावर गाडी कोणी चालवली होती?

Priyanka Gandhi
शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले, तिन्ही कृषी कायदे मागे पंतप्रधानांची मोठी घोषणा

दरम्यान, आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले, 'आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.

त्याचबरोबर त्यांनी, 'आजच सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शून्य बजेट शेती अर्थात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन पीक पद्धतीत शास्त्रोक्त पद्धतीने बदल करणे, एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करणे, अशा सर्व विषयांवर एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असतील.' असे सांगितले आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी 'शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महान मोहिमेत देशात तीन कृषी कायदे आणले गेले. देशातील शेतकर्‍यांना, विशेषत: लहान शेतकर्‍यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा त्यामागचा उद्देश होता.' असे सांगतच 'देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटनांकडून ही मागणी सातत्याने केली जात होती. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत देखील केले व पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आज खूप ऋणी आहे.' असे सांगत पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com