'क्यों डराते हो डर की दीवार से?' प्रियंका गांधींचा मोदी सरकारला सवाल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

बैरिकेट्सचा  फोटो सोशल मिडियावर शेअर करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आणि भीतीची भिंत दाखवून कशाला घाबरवत आहात? असा प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर त्यांनी दिल्ली सीमेवर असलेल्या  बॅरिकेडिंगचा फोटो शेअर केले आहे.

नवी दिल्ली: तीनही नवीन शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन  सुरू आहे. दरम्यान, कॉंग्रेस सरचिटणस प्रियंका गांधी यांनी दिल्ली सीमेवरील पोलिसांच्या सुरक्षा वेढा असलेल्या बैरिकेट्सचा  फोटो सोशल मिडियावर शेअर करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आणि भीतीची भिंत दाखवून कशाला घाबरवत आहात? असा प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर त्यांनी दिल्ली सीमेवर असलेल्या  बॅरिकेडिंगचा फोटो शेअर केले आहे. 'क्यों डराते हो डर की दीवार से ?' असे कॅप्शन त्या फोटोला दिले आहे.

26 जानेवारीला लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सिंगू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर जबरदस्त बॅरिकेडिंग केली आहे.  काटेरी तार आणि रस्त्यावर खिळे रोवण्यात आले आहेत. बर्‍याच ठिकाणी पोलिसांनी 20-स्तरीय सुरक्षा रिंग तयार केली आहे.

उद्योगपती रतन टाटा म्हणाले, लोकांच्या या भावनेचं कौतुकच पण.... -

इकडे कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले. दुपारी 12 ते दुपारी 3 दरम्यान हा जाम करण्यात आला आहे. हे लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवला आहे. संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये 50, 000 पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सीमावर्ती भागावर नजर ठेवून आहेत.

मोदी सरकारनं देशाचं आणि सर्वसामान्यांचं बजेट बिघडवलं -

एवढेच नव्हे तर खबरदारीच्या म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिने दिल्ली मेट्रोची 10 स्थानके बंद करण्यात आली आहेत. एंट्री आणि एक्झीट थांबविण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले होते.

संबंधित बातम्या