संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई सूडाच्या भावनेने - प्रियांका गांधी

प्रियंका गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल
Priyanka Gandhi
Priyanka GandhiDainik Gomantak

आपण भाजपच्या ऑफरला प्रतिसाद देत नाही म्हणून भाजप आपल्यावर कारवाईचा बडगा उगारत आहे. अशा आशयाचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांना ईडीने कारवाईसाठी नोटीस बजावल्यानंतर वक्तव्य केले होते. यानंतर आता याबाबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी शनिवारी केंद्रावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई सूडाच्या भावनेनेच आहे. (priyanka Gandhi say sanjay Raut ED action spirit of revenge)

Priyanka Gandhi
Udaipur Murder Case: कन्हैया लाल हत्येतील आरोपींची NIA कोठडी रवानगी

पुढे बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप आपल्या लोकशाहीविरोधी राजकारणाच्या विरोधात उभा असलेला आवाज दाबण्यासाठी प्रत्येक युक्ती अवलंबत आहे. पण, लोकशाहीत खोटेपणा आणि दडपशाहीची फार काळ टिकणार नाही. असे ही त्या म्हणाल्या.

काय आहे नेमके प्रकरण ?

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली होती. यावर पहिल्यांदा 28 जून रोजी समन्स बजावण्यात आले होते, परंतु राऊत यांच्या वकिलाने त्यांच्या हजर राहण्यासाठी आणखी काही वेळ मागितला होता. त्यानंतर ईडीने नवीन समन्स जारी करून त्याला शुक्रवार, 1 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले.

Priyanka Gandhi
नुपूर शर्माला लुकआउट नोटीस, समन्स जारी तरी ही गैरहजर

त्यांच्या चौकशीनंतर सेनेच्या नेत्याने एक जबाबदार नागरिक आणि खासदार या नात्याने तपास यंत्रणेने त्यांना बोलावले तर हजर होणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. मात्र, वेळेची अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. "परंतु ईडीचे अधिकारी माझ्याशी चांगले वागले. मी त्यांना सांगितले की गरज पडल्यास मी पुन्हा येऊ शकतो, असे राऊत यांनी सांगेितले. मुंबईतील चाळीचा पुनर्विकास आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत आणि इतर सहकारी यांच्यातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित राऊत यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com