प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण 

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण 
robard vadra.jpg

देशाचे प्रसिद्ध व्यापारी आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह झाली आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. मात्र, प्रियंका गांधीं यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मी माझा आसाम दौरा रद्द केल्याची माहिती  प्रियंका गांधी यांनी दिली आहे. मी आता विलगीकरणात राहणार आहे, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. नुकताच कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यामुळे मला माझा आसाम, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द करावा लागला आहे. माझा कालचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी पुढचे काही दिवस अलिप्त राहणार आहे. या गैरसोयीबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि  कॉंग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.  विशेष म्हणजे प्रियंका गांधी आज आसाममध्ये तीन सभा घेणार होत्या. आसाम मधील गोलपारा पूर्व, गोलकगंज आणि सरूखेत्री त्यांच्या आज जाहीर सभा होत्या. मात्र त्यांनी दौरे रद्द करून विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे.  

दरम्यान, आज देशात कोरोनाचे  81 हजार 466 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. जी गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक  आकडेवारी आहे. नवीन प्रकरणे आढळूनआल्यानंतर आता देशात संसर्गाची एकूण संख्या 1 कोटी 23 लाख 3 हजार 131 वर पोहचली आहे. आकडेवारीनुसार 2 ऑक्टोबर 2020 रोजी एका दिवसात देशात संक्रमणाची 81 हजार 484 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर काल संसर्गामुळे आणखी 469 लोकांचा मृत्यू झाला.  तर आतापर्यंत कोरोनाने  मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख 63 हजार 396 वर गेली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com