सहारनपूरमध्ये प्रियंका गांधींची महापंचायत; जिल्ह्यात कलम 144 लागू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

सहारनपूरच्या चिलकाना येथील किसान पंचायतीमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने जिल्ह्यात कलम -144 लागू केली आहे. कॉंग्रेसचे नेते गावागावात जाऊन लोकांना पंचायतीमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत.

चिलकाना: कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आज शाकंभरी देवी मंदिरात पुजा केल्यानंतर चिलकाना येथील किसान पंचायतीला संबोधित करणार आहेत. जर या पंचायतीमध्ये राजकीय मुद्दे उपस्थित झाले तर काँग्रेसकडून शेतकऱ्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. या कार्यक्रमाची पूर्ण तयारी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी केली आहे

सहारनपूरच्या चिलकाना येथील किसान पंचायतीमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने जिल्ह्यात कलम -144 लागू केली आहे. कॉंग्रेसचे नेते गावागावात जाऊन लोकांना पंचायतीमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. माजी आमदार इम्रान मसूद म्हणाले की, आज बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत महासचिव प्रियंका गांधी किसान पंचायत मध्ये पोहचतील. त्याच्या स्वागतासाठी स्टेज सज्ज आहे आणि कार्यक्रमस्थळी सुमारे 15 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एवढ्याच लोकांसाठी उभे राहण्याचीसुध्दा सोय करण्यात आली आहे. पैठ बाजार आणि पशु मंडी मार्केटमध्ये वाहन पार्किंगची व्यवस्थी केली आहे. कार्यक्रमादरम्यान व्यवस्था सांभाळण्यासाठी वॉलंटियर्स तैनात केले जातील. कोणत्याही प्रकारच्या अव्यवस्थापनाला परवानगी दिली जाणार नाही.

उत्तराखंड दुर्घटना: अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी सांगितले उत्तराखंड दुर्घटनेचे खरे कारण -

सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात

कॉंग्रेसच्या किसान पंचायती दरम्यान शांतता राखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे. एसपी सिटी विनीत भटनागर यांनी सांगितले की, कार्यक्रमस्थळी सहा एसएचओ, 10 सब इंस्पेक्टर, 40 कॉन्स्टेबल, एक प्लॅटून पीएसी, एक व्रज वाहन, 10 महिला कॉन्स्टेबल, पाच ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल आणि चिलकाना पोलिस स्टेशनचे पोलिस उपस्थित राहणार आहेत.

इंदिराजी आणि राजीव गांधी यांचा चिलकानाशी जुना संबंध 

कॉंग्रेसच्या नेत्यांचा चिलकानाशी जुना संबंध आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये चिलकाना येथे भेट दिली होती. तत्कालीन पाटबंधारे मंत्री महमूद अली खान यांच्या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. यानंतर 1983 मध्ये कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव गांधीही यांनी देखील येथे एका मोठ्या जनसभेला संबोधित केल होते.

 

 

संबंधित बातम्या