कोरोनावरील उपचार पद्धतीच्या संशोधनाबद्दल भारतीय वंशाच्या अनिकाला बक्षीस

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

कोरोना संसर्गाने जगाला पछाडलेले असताना चौदा वर्षाच्या भारतीय-अमेरिकी विद्यार्थीनीने कोविड-१९ वरील संभाव्य उपचार पद्धतीचा शोध लावल्याबद्धल २५ हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस पटकावले आहे

ह्यूस्टन : कोरोना संसर्गाने जगाला पछाडलेले असताना चौदा वर्षाच्या भारतीय-अमेरिकी विद्यार्थीनीने कोविड-१९ वरील संभाव्य उपचार पद्धतीचा शोध लावल्याबद्धल २५ हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस पटकावले आहे.

टेक्सासमाधील फ्रिस्को येथील शाळेत ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीचे नाव अनिका चेब्रोलू असे आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गावरील संभाव्य उपचाराचा शोध लावला.

अनिका चेब्रोलू हिने ‘थ्री एम यंग सायंटिस्ट चॅलेंज’ या ऑनलाइन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. ‘थ्री एम’ ही मिनीसोटा येथील कंपनी आहे. आठवीत असतानाच आपण असा प्रोजेक्ट दाखल केला होता, असे अनिकाने सांगितले. गेल्यावर्षी तिने हिवतापाशी दोन हात केल्यानंतर तिने स्पर्धेत सहभागी होण्याचे 
ठरवले.

 अनिकाचे संशोधन
अनिकाने आपल्या संशोधनात संगणकीय सिम्युलेशन, म्हणजेच ‘इन सिलिको’ प्रक्रियेचा वापर करत कोरोनाचा संसर्ग रोखणाऱ्या रेणूच्या शोधासाठी औषध तयार करण्याची पद्धत शोधून काढली. हा रेणू कोरोना विषाणूच्या शरीरातील प्रसाराला आळा घालू शकतो.  या संशोधनाबाबत अनिका म्हणाली, की विषाणूच्या प्रोटीनवर मारा करणाऱ्या रेणूचा प्रयोग केल्यास संसंर्गाचा प्रसार थांबेल. 

संबंधित बातम्या