राज्यांसाठी रेल्वेकडून कोविड केअर कोच निर्मिती

राज्यांसाठी रेल्वेकडून कोविड केअर कोच निर्मिती
Good news Production of 4000 Kovid Care Coaches from Railways for States

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रोज लाखांच्या संख्येत कोरोना बाधित आढळून येत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन (Oxgen), व्हेंटिलेटर्स, बेड. रेमडेसिव्हीर (Remdesivir) व कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेकडून भारत सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला असल्याचे दिसत आहेत. रेल्वे मंत्रालयाने (Raliways Ministry) 64 हजार बेडसह जवळपास 4000 कोविड कोच (Covid Coach) राज्यांना वापरण्यासाठी तयार केले आहेत. आत्तापर्यंत 169 कोविड कोच विविध राज्यांकडून सोपवण्यात आले आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे. (Production of Covid Care Coaches by Railways for States)

राज्यांच्या मागणीनुसार रेल्वे विभागाने भोपाळ (Bhopal) , इंदौर (Indore) , नागपूर (Nagpur), जवळच्या तिहीसाठी कोविड केअर कोच तयार केले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि नागपूर महापालिका आयुक्त यांच्या दरम्यान 11 कोविड केअर कोचसाठी सामंजस्य करार झाला आहे, अशी माहिती देखील रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

सध्या रेल्वे विभागाकडे 16 झोनमध्ये 4002 डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. राज्यांकडून कोविड कोचची मागणी आली तर ते उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली होती. कोविड कोचमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या सुविधेसाठी अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत. ऑक्सिजन सिलिंडर, कुलर यासह अनेक सुविधा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेकडे 386 आयसोलेशन कोच उपलब्ध आहेत. त्यापैकी 128 कोच मुबंई विभागात आहेत. एखाद्या राज्याने आयसोलेसन कोचची मागणी केल्यास ते त्या राज्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली होती.
 

Related Stories

No stories found.