ऑगस्ट महिन्यापासून देशात सरु होणार स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन

दैनिक गोमंतक
शनिवार, 22 मे 2021

मे महिन्याच्या अखेरीस स्पुटनिकचे 30 लाख डोस भारताला पुरविण्यात येणार आहेत. जूनमध्ये हे वाढवून 50 लाखांपर्यंत नेण्यात येतील अशी अपेक्षा आहे. देशात या वर्षी स्पुटनिक व्ही च्या 85 कोटींहून आधिक लस तयार करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : भारतातील लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाची (Russia) लस स्पुटनिक-व्ही (Sputnik V) या लसीचा देखील समावेश झाला असून ऑगस्ट (August) महिन्यापासून या लसीचे उत्पादन देशात सुरु होणार आहे. अशी माहिती रशियातील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली आहे.(Production of Sputnik V vaccine will start in the country from August) 

"कोरोना परिस्थितीतही जगातील सगळ्यात मोठी शक्ती बनतोय भारत"

वर्मा म्हणाले, मे महिन्याच्या अखेरीस स्पुटनिकचे 30 लाख डोस भारताला पुरविण्यात येणार आहेत. जूनमध्ये हे वाढवून 50 लाखांपर्यंत नेण्यात येतील अशी अपेक्षा आहे. देशात या वर्षी स्पुटनिक व्ही च्या 85 कोटींहून आधिक लस तयार करण्यात येणार आहेत. भारतात या लसीच्या एका डोसची किंमत जीएसटीसहित 995 रुपये इतकी आहे. याची पहिली खेप 1 मे  रोजी भारतात दाखल झाली आहे. कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून 13 मे 2021 ला ही लस मंजूर झाली. स्फुटनिक व्ही लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत हा जगातील 60 वा देश आहे. ही लस कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्डपेक्षा जास्त प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियातील गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने  स्पुटनिक-व्ही लस ही 91.6 टक्के प्रभावी सांगितले आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसी वापरण्यात येत आहेत. या लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या