Video, Professor Asks for Sexual Favour: शाळा-महाविद्यालयेही सुरक्षित नाहीत! प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरिरसुखाची मागणी

UP  Professor : प्रोफेसर बोलत असताना विद्यार्थीनीने शांतपणे हा व्हिडिओ बनवला. यामध्ये दोघांमधील संवाद ऐकू येत आहे.
Video, Professor Asks for Sexual Favour: शाळा-महाविद्यालयेही सुरक्षित नाहीत! प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरिरसुखाची मागणी
Dainik Gomantak

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचा एक अतिशय लाजिरवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो एका विद्यार्थिनीकडून शरिरसुखाची मागणी करताना दिसत आहे. विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रोफेसर बोलत असताना विद्यार्थीनीने शांतपणे हा व्हिडिओ बनवला. यामध्ये दोघांमधील संवाद ऐकू येत आहे.

पूर्वांचल विद्यापीठाच्या टीडी कॉलेजच्या प्राचीन इतिहास विभागाचे प्रभारी (एचओडी) प्रदीप सिंह या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. प्रदीपने विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी बोलण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या संभाषणातून कळते. कामाच्या बहाण्याच्या बहाण्याने हा प्राध्यापक विद्यार्थिनीला अश्लील प्रश्न विचारत आहे. शरिरसुखाच्या बदल्यात हा प्राध्यापक विद्यार्थिनीला नोकरीचे आश्वासनही देत ​​आहे.   

या नराधम प्राध्यापकाच्या तावडितून सुटण्यासाठी विद्यार्थिनी विषय बदलण्याचा प्रयत्न करतेय पण हा प्राध्यापक त्याच्याच मुद्द्यावर ठाम आहे. व्हिडिओमध्ये पीडित मुलगी दिसत नाही, पण तीचा आवाज ऐकू येतोय.

या व्हिडिओबाबत टीडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आलोक सिंह म्हणाले, या व्हिडिओमध्ये प्राध्यापक प्रदीप सिंह दिसत आहेत. संभाषण अतिशय लज्जास्पद, अश्लील आणि अनैतिक आहे. या व्हिडिओची स्वत:हून दखल घेत आम्ही डॉ. प्रदीप सिंह यांच्याकडून ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे. यासाठी त्यांना ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावर कारवाई केली जाईल.

आलोक सिंग पुढे म्हणाले, ' एका प्राध्यापकासाठी हे कृत्य अत्यंत अशोभनीय आहे. जी काही कठोर कारवाई करता येईल, ती व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार केली जाईल. अद्यापपर्यंत विद्यार्थिनीचे नाव किंवा कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही बाब निंदनीय, लाजिरवाणी आणि वाईट आहे. निलंबनाचा अधिकार व्यवस्थापकाला आहे, त्याच्या निर्णयावर पुढील कारवाई केली जाईल.

Video, Professor Asks for Sexual Favour: शाळा-महाविद्यालयेही सुरक्षित नाहीत! प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरिरसुखाची मागणी
Hindu Rashtra : "कल्याणासाठी हिंदू राष्ट्राची गरज नाही...", अविमुक्तेश्वरानंद कडाडले

पोलिसांना मिळालेल्या व्हिडीओची सत्यता आणि स्रोत याबाबत माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत आम्हाला कोणत्याही विद्यार्थ्याकडून किंवा महाविद्यालयाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, समोर आलेल्या व्हिडिओची सत्यता पोलीस तपासत आहेत.

 गुरुवार 25 मे पासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या नराधम प्राध्यापकावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Video, Professor Asks for Sexual Favour: शाळा-महाविद्यालयेही सुरक्षित नाहीत! प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरिरसुखाची मागणी
FIR on 100 years old lady: होय, खरंच! 100 वर्षीय महिलेवर खंडणीचा गुन्हा; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com