Panthers Party चे प्रमुख भीम सिंह यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे (Panthers Party) संस्थापक आणि माजी आमदार प्रोफेसर भीम सिंह यांचे मंगळवारी जम्मूमध्ये निधन झाले.
Professor Bhim Singh
Professor Bhim SinghDainik Gomantak

जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार प्रोफेसर भीम सिंह यांचे मंगळवारी जम्मूमध्ये निधन झाले. 81 वर्षीय भीम सिंह जवळपास महिनाभर आजारी होते. सिंह हे उधमपूर जिल्ह्यातील भुगतारियन गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी जय माला आणि मुलगा अंकित लंडनमध्ये राहतात. (Professor Bhim Singh founder of the Jammu and Kashmir National Panthers Party and former MLA has died in Jammu)

दरम्यान, सिंह यांनी जीएमसी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रोफेसर भीम सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "प्राध्यापक भीम सिंह जी हे तळागाळातील नेते म्हणून स्मरणात राहतील, ज्यांनी जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले.''

Professor Bhim Singh
Jammu-Kashmir: अवंतीपोरामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवादी ठार

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सांगितले की, 'सिंह यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दु:ख झाले.' त्यांनी ट्विट करत म्हटले की, या दु:खाच्या प्रसंगी कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती. त्याचवेळी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनीही प्राध्यापक भीम सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Professor Bhim Singh
Jammu And Kashmir:....दहशतवादाविरोधात मोहीम राबवा, अमित शाहांचे निर्देश

ते म्हणाले, "जेके पँथर्स पार्टीचे संस्थापक प्रोफेसर भीम सिंग यांच्या निधनाची बातमी कळल्यावर दुःख झाले. जम्मू-काश्मीरच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे तळागाळातील नेते म्हणून ते स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांप्रतीही माझ्या संवेदना."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com