पैगंबर विवाद: रांचीच्या हनुमान मंदिरावर बदमाशांचा हल्ला, अनेक पोलीस जखमी

नुपूर शर्माने पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रांचीमध्ये गोंधळ झाला.
Ranchi
RanchiDainik Gomantak

नुपूर शर्माने पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रांचीमध्ये गोंधळ झाला. मुस्लिम समाजाने दुकाने बंद ठेवून केलेल्या निदर्शनाला दुपारी हिंसक वळण लागले. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी करण्यात आलेले बॅरिकेडिंग लोकांनी तोडले. पोलिस प्रशासनाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली.

दरम्यान, जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांना 10 राऊंड हवेत गोळीबार करावा लागला. पोलिस (Police) -आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर उपद्रव सुरुच ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. रांचीच्या मुख्य रस्त्यावर तोडफोड करण्यात आली. हनुमान मंदिराभोवतीही जोरदार निदर्शने करण्यात आली. मुख्य रस्त्यावरील रतन टॉकीज गल्लीत आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी अनेक चोरटे जमले आहेत.

Ranchi
पैगंबर विवाद: यूपीतील अनेक जिल्ह्यांत नमाजानंतर गोंधळ; प्रयागराजमध्ये दगडफेक

दुसरीकडे, प्रयागराजमध्ये डीएम संजय कुमार खत्री आणि एसएसपी अजय कुमार हे देखील शुक्रवारच्या नमाजपूर्वी जामा मशिदीबाहेर पोहोचले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. शुक्रवारच्या नमाजानंतर अटाळा चौक आणि आजूबाजूच्या रस्त्यावर उपस्थित अल्पवयीन मुलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील मुलांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेकही केली. यामध्ये अर्धा डझनहून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com