नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्ये उठला आवाज, मौलानांनी मुस्लिमांवर केला आरोप

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा या पैगंबर मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चर्चेत आहेत.
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak

Nupur Sharma Row: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा या पैगंबर मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम देशांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी भारताला लक्ष्य केले आहे. नुपूर शर्मांच्या विरोधात पाकिस्तानमध्येही निदर्शने झाली. मात्र आता नुपुर शर्मांच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ आवाज उठला आहे.(prophet row pakistan maulana muhammad ali mirza comes in support of bjp nupur sharma)

मुहम्मद अली मिर्झा यांनी मुस्लिमांवर हा आरोप केला

पाकिस्तानचे (Pakistan) मौलाना मोहम्मद अली मिर्झा यांनी नुपूर शर्मांना पाठिंबा दिला आहे. मुस्लिमांनी नुपूरला पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मौलाना अली म्हणाले की, चर्चा सुरु असताना मुस्लिम पॅनेलच्या एका सदस्याने आधी नुपूर शर्मांना चिथावणी दिली. त्यानंतर प्रत्युत्तरात भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्याने पैगंबराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

Nupur Sharma
प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य : नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या

मोहम्मद अली मिर्झा म्हणाले की, 'पहिला गुन्हेगार हा मुस्लिम आहे, ज्याने थेट टीव्ही डिबेटमध्ये बोलताना एखाद्याच्या धर्माबद्दल भाष्य केले. त्यानंतर वादाचे पडसाद हिंसाचाराच्या रुपात उमटले. दुसरीकडे, नुपुर शर्मांनी थेट पैंगबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. नुपूर शर्मा म्हणाल्या की, तुम्ही असे बोलाल तर आम्हीही हेच बोलू. पहिला गुन्हेगार मुस्लिम आहे, ज्याने थेट टीव्ही कार्यक्रमात बोलताना एखाद्याच्या धर्माबद्दल भाष्य केले.'

Nupur Sharma
नुपूर शर्मांवर बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ; काश्मीर खोऱ्यात एकाला अटक

मुहम्मद अली पुढे म्हणाले की, ''कुराणानुसार असे नाही की तुम्ही एखाद्याच्या धर्माची खिल्ली उडवावी. इतर धर्मीय लोकांशी वाद घालताना भाषेचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. अल्लाहने हाच संदेश दिला आहे. मौलाना अली पुढे म्हणाले की, नुपूर शर्मा वादात अरब देशांतील लोक एसीमध्ये बसून वातावरण चिघळवत आहेत, तर भारतात (India) लोक कडक उन्हात आंदोलन करत आहेत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com