पैगंबर विवाद: यूपीतील अनेक जिल्ह्यांत नमाजानंतर गोंधळ; प्रयागराजमध्ये दगडफेक

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील मुस्लिम बांधवांनी सलग दुसऱ्या शुक्रवारी विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली.
पैगंबर विवाद: यूपीतील अनेक जिल्ह्यांत नमाजानंतर गोंधळ; प्रयागराजमध्ये दगडफेक
PrayagrajDainik Gomantak

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील मुस्लिम बांधवांनी सलग दुसऱ्या शुक्रवारी विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली. यातच प्रयागराजमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अटाळामध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पहिल्यांदा घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर गदारोळ झाला. (Protests erupted in several districts of Uttar Pradesh against Nupur Sharma's remarks about Prophet Mohammad)

दरम्यान, पोलिसांनी (Police) आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज करुन दंगल करणाऱ्या लोकांचा पाठलाग केला. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रयागराजसोबतच (Prayagraj) लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्येही गदारोळ झाला.

Prayagraj
पैगंबर विवाद: जामा मशिदीत नुपूर शर्मांचा निषेध, नमाजानंतर जोरदार घोषणाबाजी

दुसरीकडे, प्रयागराजमध्ये डीएम संजय कुमार खत्री आणि एसएसपी अजय कुमार हे देखील शुक्रवारच्या नमाजपूर्वी जामा मशिदीबाहेर पोहोचले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. शुक्रवारच्या नमाजानंतर अटाळा चौक आणि आजूबाजूच्या रस्त्यावर उपस्थित अल्पवयीन मुलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील मुलांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेकही केली. यामध्ये अर्धा डझनहून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

तसेच, पोलिस अधिकारी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जमावाचा गोंधळ सुरुच आहे. मोठ्या संख्येने पोहोचलेल्या लोकांनी नुपूर शर्मांना फाशी देण्याची मागणी केली. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी तणावाच्या वातावरणात वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Prayagraj
पैगंबर वादाप्रकरणी खान स्टार्सच्या मौनावर नसीरुद्दीन शाहांनी साधला निशाणा

त्याचवेळी, सहारनपूरमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी गोंधळ घातला. शुक्रवारच्या नमाजानंतर सहारनपूरच्या रस्त्यावर उतरलेल्या मुस्लिम (Muslim) समाजातील नागरिकांनी मशिदीबाहेर 15 ते 20 मिनिटे घोषणाबाजी केली. सहारनपूरमधील जामा मशिदीत दुपारी 1 वाजता शुक्रवारची नमाज सुरु झाली. यानंतर नमाज संपवून नमाजी मशिदीतून बाहेर आले तेव्हा त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. हातात तिरंगा घेऊन आलेल्या तरुणांनी निदर्शनेही केली. यानंतर अधिकाऱ्यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर निदर्शने करुन सर्वजण आपापल्या घरी परतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com