PUBG भारतात परत! असे करा बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाचे प्री-रजिस्ट्रेशन

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 मे 2021

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची पूर्व-नोंदणी करण्यासाठी, Google Play Store वर गेम सर्च करा. दिलेल्या पर्यायांचा वापर करून आपण खेळाच्या Google Play Store सूचीवर जावून प्री रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.

PUBG is back in India:बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची पूर्व-नोंदणी(Battlegrounds Mobile India pre-registration) आता थेट करण्यात आली आहे. मेच्या अगोदरच देशात पबजी मोबाइल इंडियाची(Mobile India) पर्यायी घोषणा करण्यात आली होती. कंपनीने अद्याप अधिकृत बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया लाँचिंगच्या तारखेची घोषणा केली नाही. मात्र हा गेम एकदा भारतात लॉन्च झाल्यानंतर खेळाडू पूर्व-नोंदणी करु शकणार आहेत, असे कंपनीने सांगितले आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची पूर्व-नोंदणी कशी करावी ते येथे पाहा.(PUBG is back in India how to do pre registration of Battlegrounds Mobile India)

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची पूर्व-नोंदणी कशी करावी?

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची पूर्व-नोंदणी करण्यासाठी, Google Play Store वर गेम सर्च करा. दिलेल्या पर्यायांचा वापर करून आपण खेळाच्या Google Play Store सूचीवर जावून प्री रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. एकदा हा गेम देशात सुरू झाल्यावर तुम्हाला हा गेम आपल्या मोबाइलमध्ये इंस्टॉल करता येइल, अशी माहीती मिळाली आहे.

Coronavrius: देशात मागील 5 दिवसात 2 लाख अ‍ॅक्टिव रुग्ण झाले कमी

मिळणार खास बक्षिसे

ज्या वापरकर्त्यांनी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियासाठी पूर्व-नोंदणी केली त्यांना काही खास बक्षिसे मिळण्याचे आश्वासन दिले गेले आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या पूर्व नोंदणीसाठी साइन अप करणार्‍या खेळाडूंना विशेष बक्षिस मिळतील असे कंपनीने घोषित केले आहे. यामध्ये रीकन मास्क, रेकॉन आउटफिट, सेलिब्रेशन एक्सपर्ट टायटल आणि 300 एजीचा समावेश आहे. केवळ भारतीय खेळाडू स्पेशल बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियासाठी पूर्व नोंदणी करण्यास पात्र असणार आहेत. एकदा हो गेम भारतात लाँच झाला की खेळाडू बक्षिसाची डिमांड करू शकतात, असे कंपनीने सांगितले.

शाहिद जमील यांच्या राजीनाम्यानंतर ओवीसींची मोदी सरकारवर टीका 

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या प्रकाशन तारखेद्दल अधिकृत तारीख अद्याप जाहीर केली नाही. पबजी मोबाइल पर्यायी गेम औपचारिकपणे जून 2021 मध्ये सुरू होणार, असे ऑनलाइन अहवालात सूचित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या