होय जी.. आता PUB-G देशातूनच जाणार जी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

याआधी भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक करत चीनच्या 118 ऍपवर बंदी घातली होती. या बंदी घातलेल्या ऍपमध्ये प्रसिध्द अशा पबजी या गेमिंग ऍपचाही समावेश होता.

नवी दिल्ली-  संपूर्ण देशातील युवकांना अक्षरश: वेड लावणारा पबजी आजपासून (30 ऑक्टोबर) बंद होणार आहे. पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट दोन्ही ऍप भारतात पुर्णपणे काम करणे काम थांबवणार आहेत. कंपनीने बुधवारी फेसबूक पोस्टद्वारे याबद्दलची माहिती दिली.

याआधी भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक करत चीनच्या 118 ऍपवर बंदी घातली होती. या बंदी घातलेल्या ऍपमध्ये प्रसिध्द अशा पबजी या गेमिंग ऍपचाही समावेश होता. भारताने या कारवाईचे चीनकडून असणाऱ्या डिजीटल धोक्याचे कारण दिले होते.  

  अशा वेळी ही मोठी घोषणा झाली की ज्यावेळी पबजी मोबाईलने लिंकडीनवर एका पोस्टद्वारे भारतात बॅटल रॉयल-स्टाइव गेम लवकरच पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगितले. मात्र, भारतात आता पबजी गेमला प्ले-स्टोर आणि एप्पल एप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. 

 फक्त भारतातूनच पबजीचे 25 टक्के युजर्स  

कोरोनाकाळात पबजी गेमिंग ऍपच्या वापरात मोठी वाढ झाली होती. याकाळात नवीन युजर्सची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढली होती. जगभरातील पबजीच्या युजर्सपैकी तब्बल 25 टक्के युजर्स भारतातील होते. आता पबजी भारतातून बंद झाल्याने कंपनीला खूप मोठा फटका बसला आहे.

भारतात पबजीवर बंदी घालताच चीनच्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यूमध्ये 34 अरब डॉलरची घट दिसून आली होती. टेन्सेंट कंपनीने पबजी गेमिंग ऍपच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे कमावले होते. भारतातून प्रत्येक दिवशी या ऍपचा 3 कोटींपेक्षा जास्त लोकं वापर करत होते. पबजीच्या एक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत भारत टॉपवर होता. यामुळेचा टेन्सेंट कंपनी भारतात सर्वात जास्त पैसे कमावत होती.

संबंधित बातम्या