चेन्नईत पावसाचा धुमाकूळ ; आज सार्वजनिक वाहतूकीवर बंदी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.

चेन्नई :  निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतुकीवर बंद ठेवण्यात आली आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तयार झाले असून ते तमिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकले आहे. यादरम्यान १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. वादळ अतितीव्र होईल, तेव्हा वाऱ्याचा वेग प्रतितास १६५ किलोमीटरपर्यंत पोचेल, अशी माहिती चेन्नईतील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किनारपट्टीवर व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. 

अधिक वाचा :

कोणत्याही धर्माचा जीवनसाथी निवडणे अंगभूत अधिकार

सुपरसॉनिक ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

संबंधित बातम्या