पद्दूचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांचा राज्यपाल किरण बेदी यांच्या विरोधात निषेध

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

पद्दूचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी गोबर्ट पुतळ्याशेजारील भारती पार्क जवळील रस्त्यावर बसून आंदोलन करत  आहे.

पद्दूचेरी: पद्दूचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना समाज कल्याण मंत्री एम. कंदसामी यांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी गोबर्ट पुतळ्याशेजारील भारती पार्क जवळील रस्त्यावर बसून आंदोलन करत  आहे.

श्री. नारायणसामी, त्यांचे कॅबिनेट सहकारी आणि खासदार व्ही. वैथिलींगम यांच्यासह श्री कंदसामी यांना भेटण्यासाठी विधानसभेला गेले असता, पोलिसांनी त्यांना थांबवले. गोबर्ट पुतळ्याजवळ मुख्यमंत्र्यांनी चक्क रस्त्यावर बसून राज्यपाल किरण बेदी यांच्या विरोधात निषेध नोंदवला आहे. पोलीस बंदोबस्त असल्याने प्रसार माध्यमे त्या ठीकाणी पोहचू शकले नाही. 

आणखी वाचा:

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना गोवा मेडिकल कॉलेजमधून डिस्चार्ज -

संबंधित बातम्या