पुद्दुचेरीमध्ये पेट्रोल दर खाली येण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

राज्यात प्रशासकीय कारभार टी. सुंदरराजन याच्या हातात आहे आणि त्यांनी राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी मूल्यवर्धित कर 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुद्दुचेरी: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी सलग पेट्रोल आणि डिझेल महाग केले आहे. या वाढीनंतर इंधनाचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. आणि आता सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात पुद्दुचेरीमध्ये दर खाली येण्याची शक्यता आहे.

पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आपले बहूमत गमावले असल्या कारणाने त्यांचे सरकार पडले आहे. यापुर्वी उपराज्यपाल टी. सुंदरराजन यांनी विधानसभेत फ्लोअर टेस्टचे आदेश दिले होते. आणि त्यानंतर चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारला राजीनामा देण्यास भाग पडले होते या राजकिय नाट्यानंतर पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

त्यानंतर राज्यात प्रशासकीय कारभार टी. सुंदरराजन याच्या हातात आहे आणि त्यांनी राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी मूल्यवर्धित कर 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला देशात पेट्रोलियम पदार्थांवर केंद्राकडून केंद्रीय उत्पादन शुल्क आणि राज्यांकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जातो. या निर्णयामुळे राज्यातील नागरीकांना पेट्रोल दरात दिलासा मिळणार आहे.

 

संबंधित बातम्या