Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण; भारताने गमावले 40 जवान

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षं पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, सारं जग व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर 2,500 सैनिक असलेल्या 78 बसच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. 

नवी दिल्ली : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षं पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, सारं जग व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर 2,500 सैनिक असलेल्या 78 बसच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. जैशच्या एका दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्याला स्फोटकांनी भरलेल्या कारने धडक दिली होती. या भीषण आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशात अशी चर्चा होती की ही सफोटके अतिरेक्यांकडे आली कोठून?या संपूर्ण घटनेची चौकशी करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) मार्च २०२० मध्ये झालेल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे केले. 

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी गजाआड

अहवालात म्हटले आहे की पुलवामा हल्ल्यात बॉम्ब बनवण्यासाठी वापरले केमिकल्स ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केले होते. एनआयएने या दहशतवादी कटात सामील झालेल्या दोन आरोपींना अटक केली, त्यानंतर अनेक खुलासे झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासठी मार्च 2020 मध्ये श्रीनगरचा 19 वर्षीय वाईज-उल इस्लाम आणि पुलवामा जिल्ह्यातील हाकिरपोरा भागातील मोहम्मद अब्बास राथेर यांना अटक करण्यात आली होती. हल्ल्यासाठी बॉम्ब (आयईडी) तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केल्याचे इस्लामने म्हटले होते.

लोकसभा: जावायांना मिळते त्या राज्यात जमिन; अर्थमंत्र्यांचं काँग्रेसला रोख ठोक प्रत्युत्तर

यामध्ये केमिकल, वायर, बॅटरी आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता. इस्लामने कबूल केले की त्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आदेशानुसारच ऑनलाइन शॉपिंग केले होते. एनआयएकडून सांगण्यात आले होते की, इस्लामने अ‍ॅमेझॉनवरून सामन घेल्यानंतर ते जैशच्या दहशतवाद्यांना दिले. इस्लामसह अटक करण्यात आलेल्या मोहम्मद अब्बास राथेरने आदिल अहमद डार, समीर अहमद डार आणि पाकिस्तानी कामरान या आत्मघातकी हल्लेखोरांना आपल्या घरात लपवून ठेवले होते.

संबंधित बातम्या