मसूद अझर हाच पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार: एनआयए

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रात पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर आणि त्याचा भाऊ रऊफ अश्गर हे या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आहेत.

नवी दिल्ली: गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा मंगळवारी जम्मूच्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रात पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर आणि त्याचा भाऊ रऊफ अश्गर हे या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आहेत. मंगळवारी एनआयएने जम्मूमधील विशेष एनआयए कोर्टात तेरा हजार पाचशे पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी कसा हल्ला केला याचा उल्लेख आहे.

१४ फेब्रुवारी, २०१९ रोजी पुलवामा येथे आत्मघाती हल्ल्यात कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. यामुळे मोठा स्फोट होऊनहून यात ४० सैनिक ठार झाले होते.

या चार्जशीटमध्ये मध्ये २० आरोपींची नवे असून यात जैश-ए-मोहम्मद म्होरक्या, अनेक दहशतवादी कारवायांदरम्यान ठार झालेले दहशतवादी आणि या हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या अर्धा डझन आरोपींची नावे असल्याची माहिती आहे. एनआयएच्या उपमहानिरीक्षक सोनिया नारंग यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, ही एक फार मोठी चार्जशीट आहे आणि आम्ही आज ती जम्मू कोर्टात दाखल करणार आहोत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या