Punjab Election: मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहिबमधून लढवणार निवडणूक

पंजाबमध्येही कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहीब तर नवज्योत सिंग सिध्दू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत.
Punjab Chief Minister Channi & Navjyot Singh Sidhu
Punjab Chief Minister Channi & Navjyot Singh Sidhu Dainik Gomantak

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. यामध्ये पंजाब राज्याचाही समावेश आहे. यातच आता उत्तरप्रदेशमध्ये भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर पंजाबमध्येही कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहीब तर नवज्योत सिंग सिध्दू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत.

Punjab Chief Minister Channi & Navjyot Singh Sidhu
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढवणार निवडणूक

दरम्यान, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगामधून निवडणूक लढवणार आहे. परमिंदर सिंग पिंकी फिरोजपूर शहरातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच, कादियानमधून प्रतापसिंग बाजवा आणि अबोहरमधून सुनील जाखड यांचे पुतणे संदीप जाखड काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार आहेत. बस्सी पठाणाचे विद्यमान आमदार गुरप्रीत सिंग जीपी यांना काँग्रेसने कायम ठेवले आहे. त्याचवेळी मंत्री ब्रह्म मोहिंद्र यांचा मुलगा मोहित हे पटियाला ग्रामीणमधून निवडणूक लढवणार आहेत. गायक सिद्धू मुसेवाला मानसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नरेश पुरी सुजानपूरमधून काँग्रेसकडून तर अमित विज पठाणकोटमधून निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com