पंजाबच्या मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार प्रशांत किशोर घेणार फक्त 1 रुपये पगार!

दैनिक गोमन्तक
सोमवार, 1 मार्च 2021

निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांची पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांची पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. त्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती देताना, प्रशांत किशोर टोकन मनी म्हणून फक्त 1 रुपये पगार घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांना राहण्यासाठी घर, कार्यालय, टेलिफोनसह इतर सुविधा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. 

पीडितेशी लग्न करणार का? आरोपीला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांची मुख्य सल्लागार पदी निवड केल्यानंतर, सीएमओने जारी केलेल्या सेवा अटींमध्ये प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून अमरिंदरसिंग यांच्या कार्यकाळ असेपर्यंत राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रशांत किशोर यांना खासगी सेक्रेटरी, एक वैयक्तिक सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक आणि दोन शिपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. याव्यतिरिक्त, कॅबिनेट मंत्र्यांना देण्यात येणारा बंगला, कार्यालय आणि निवासस्थानी लँडलाईन व फोन व्यतिरिक्त मोबाइलचा खर्च, राज्य परिवहन आयुक्तांकडून वाहतूक करण्यासाठी गाडी, 5 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आज निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटरवरून दिली होती. अमरिंदर सिंग यांनी केलेल्या आपल्या ट्विट मध्ये, प्रशांत किशोर हे आपले मुख्य सल्लागार म्हणून रुजू झाले असल्याचे सांगण्यात आनंद होत असल्याचे म्हटले होते. तसेच पंजाबमधील लोकांच्या हितासाठी एकत्रित काम करण्यासाठी आशावादी असल्याचे अमरिंदर सिंग यांनी पुढे आपल्या ट्विट मध्ये लिहिले होते. 

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी 2017 मध्ये पंजाब मधील विधानसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. तर सध्याच्या घडीला प्रशांत किशोर यांची कंपनी पश्चिम बंगालच्या विधानसभेसाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला मदत करत आहे. प्रशांत किशोर यांची कंपनी इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी (आय-पीएसी) आहे. आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कॅम्पेनच्या प्रचाराची धुरा प्रशांत किशोर यांनी सांभाळली होती.      

संबंधित बातम्या