'16 वर्षीय मुलीला पतीसोबत राहण्यासाठी सुरक्षा द्या', उच्च न्यायालयाचे SSP ना आदेश

नातेवाईकांच्या संमतीशिवाय लग्न करणाऱ्या जोडप्याच्या संरक्षणाशी संबंधित याचिका पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे.
Punjab Haryana High Court
Punjab Haryana High CourtDainik Gomantak

नातेवाईकांच्या संमतीशिवाय लग्न करणाऱ्या जोडप्याच्या संरक्षणाशी संबंधित याचिका पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. उच्च न्यायालयाने पठाणकोटच्या एसएसपींना 16 वर्षीय मुलीला तिच्या पतीसोबत राहण्यासाठी सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. (punjab haryana high court ordered pathankot ssp to provide security to 16 year old girl to live with her husband)

दरम्यान, याचिका दाखल करताना जोडप्याने सांगितले की, 'आम्ही कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लग्न केले आहे. मुस्लिम धर्माच्या विधी पध्दतीनुसार आम्ही लग्न केले.' मुलाचे वय 22 वर्षे तर मुलीचे वय 16 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्न वैध असून आम्हाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी या जोडप्याने केली आहे. याचिकाकर्त्याने पुढे सांगितले की, 'आम्ही पठाणकोटच्या एसएसपीकडे संरक्षणासाठी आवाहनही केले होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.'

Punjab Haryana High Court
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर

दुसरीकडे, या जोडप्यांचा विवाह हा मुस्लिम पर्सनल लॉ च्या अधीन असल्याचे उच्च न्यायालयाने (High Court) नमूद केले. या अंतर्गत लैंगिक परिपक्वता प्राप्त करणारी कोणतीही व्यक्ती विवाहासाठी पात्र मानली जाते.

Punjab Haryana High Court
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-21 जून रोजी 2 दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर

तसेच, देशातील प्रत्येक नागरिकाला (Citizen) जीवन आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने पठाणकोटच्या एसएसपींना याचिकाकर्त्या दाम्पत्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com