मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील सूत्राधाराची पटली ओळख

पंजाब पोलिसांनी शुक्रवारी लखबीर सिंग लांडा याला मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून घोषित केले आहे.
मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील सूत्राधाराची पटली ओळख
Punjab PoliceDainik Gomantak

पंजाब पोलिसांनी शुक्रवारी लखबीर सिंग लांडा (Lakhbir Singh Landa) याला मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून घोषित केले आहे, ज्यामध्ये पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आरपीजी हल्ला झाला होता. (Punjab Police has identified Lakhbir Singh Landa as the mastermind behind the Mohali bomb blast case)

Punjab Police
वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला लागली आग, होरपळून चौघांचा मृत्यू

पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही के भवरा यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले, "मुख्य कटकारस्थान लखबीर सिंग लांडाच आहे आणि तो पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो एक गुंड असून 2017 मध्ये कॅनडात स्थलांतरित झाला आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनलचे प्रमुख वाधवा सिंग यांच्या निकटवर्तीय असलेल्या हरिंदर सिंग रिंडा यांचा सहकारी, आयएसआयचाच एक भाग आहे आणि तो पाकिस्तानमधून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे."

"हा स्फोट बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि पाकिस्तानस्थित ISI च्या पाठिंब्याने ते गुंडांनी मिळून केला आहे तर लांडाचा मुख्य साथीदार निशान सिंग आहे. तो देखील तरनतारनचा रहिवासीच आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्याला फरीदकोट पोलिसांनी अटक केली होती," असे भवरा म्हणाले आहेत.

पश्चिम दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला आग

पंजाब पोलिसांनी सांगितले की निशान सिंगने आणखी दोन आरोपींना त्याच्या घरात आणि त्याच्या घरात आश्रय दिला होता. मोहाली स्फोटावर पंजाब डीजीपी म्हणाले की, "त्याने आरोपींना आरपीजी सुपूर्द केले होते आणि सुमारे बारा प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग करण्यात आला आहे."

"लांडा व्यतिरिक्त, निशान आणि त्याचे दोन संपर्क बलजिंदर रॅम्बो आणि चरड सिंग देखील यामध्ये सामील आहेत. तो देखील तरनतारन जिल्ह्यातील आहे- त्याच्याकडून एक एके-47 मिळवण्यात आली, असे पंजाब डीजीपी म्हणाले.

लखबीर सिंग लांडात्याचे मुख्य सहकारी निशान सिंग आणि चरद सिंग हे देखील तरनतारन जिल्ह्यातीलच आहेत. निशानने दोन आरोपींना घटनेत सहभागींना आश्रय दिला होता आणि त्याला काही दिवसांपूर्वी फरीदकोट पोलिसांनी अटक केली होती, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Punjab Police
'...मध्यप्रदेशातही राष्ट्रगीत अनिवार्य होऊ शकते': गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

9 मे रोजी संध्याकाळी मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) गोळीबार करण्यात आला, त्या ठिकाणी स्फोट देखील झाला, पंजाबचे डीजीपी वीरेश कुमार भवरा यांनी त्यादिवशी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.