
पंजाबमधील मोहालीमध्ये गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्याचा सूत्रधार हा गुंड असून तो पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अगदी जवळचा असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री मोहालीतील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या परीसरात रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला झाला होता. त्यामुळे इमारतीच्या एका मजल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी रॉकेट हल्ल्याशी संबंधित प्रकरणात म्हटले होते की, काही लोक राज्यातील कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे असा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
सीएम मान पुढे म्हणाले होते की, "पंजाब पोलिस (Police) मोहालीतील बॉम्बस्फोटाची चौकशी करत आहेत. ज्याने पंजाबचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल."
तसेच, सोमवारी रात्री मोहालीतील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या परिसरात रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. त्यामुळे इमारतीच्या एका मजल्यावरील खिडक्यांच्या काचा फुटल्या. मोहालीतील सेक्टर 77 मधील अतिदक्षता असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड ( RPG) डागण्यात आले. त्यानंतर पंजाबमध्ये (Punjab) अलर्ट जारी करण्यात आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.