लॉकडाऊन दरम्यान डाळी आणि तेलबियांची खरेदी कायम

dainik gomantak
गुरुवार, 14 मे 2020

3.17 लाख मेट्रिक टन चणाडाळ (चणा ) आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या  9 राज्यांमधून खरेदी करण्यात आला.

नवी दिल्‍ली, 

केंद्र सरकारचा कृषी, सहकार्य आणि शेतकरी कल्याण विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन कालावधीत शेतकरी आणि शेतीविषयक कामांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करत आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अद्ययावत स्थिती पुढीलप्रमाणे 

  1. लॉकडाऊन कालावधीत नाफेडद्वारे पिक खरेदीची स्थितीः
    • 3.17 लाख मेट्रिक टन चणाडाळ (चणा ) आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या  9 राज्यांमधून खरेदी करण्यात आला.
    • 3.67 लाख मेट्रिक टन मोहरी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या 5 राज्यांमधून खरेदी करण्यात आली.
    • 1.86  लाख मेट्रिक टन  तूर खरेदी तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिशा या 8 राज्यांमधून करण्यात आली आहे.
  2. रबी विपणन हंगाम (आरएमएस) 2020-21 मध्ये एफसीआयमध्ये एकूण 277.38 लाख मेट्रिक टन गव्हाची आवक झाली असून त्यापैकी 268.90 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे.
  3. रबी हंगाम 2020-21 मध्ये अकरा (11) राज्यात रबी डाळी आणि तेलबियांची एकूण 3208 नियुक्त खरेदी केंद्रे उपलब्ध आहेत.
  4. पीएम -किसान:

24.3.2020 पासून आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत सुमारे 9.25  कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला आहे आणि आतापर्यंत 18,517 कोटी रुपये वितरित  झाले आहेत.

संबंधित बातम्या