पावसाळी अधिवेशनात फक्त लेखी प्रश्‍नांना अनुमती

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

अधिवेशन काळात तारांकित (तोंडी) प्रश्‍नांपेक्षा अतारांकित प्रश्‍नांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असते. राज्यसभेत रोज १५ तारांकित तर १६० अतारांकित प्रश्‍नांना विविध मंत्री उत्तरे देतात.

नवी दिल्ली: संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारने कोरोनाच्या सबबीखाली प्रश्‍नोत्तराच्या तासावरच फुली मारल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांचा आवाज वाढल्यावर सरकारने एक पाऊल मागे घेत अतारांकित म्हणजे लेखी प्रश्‍न विचारण्यासाठी खासदारांना मुभा दिली आहे. तोंडी प्रश्‍न मात्र विचारता येणार नाहीत, यावर सरकार ठाम आहे. अधिवेशन काळात तारांकित (तोंडी) प्रश्‍नांपेक्षा अतारांकित प्रश्‍नांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असते. राज्यसभेत रोज १५ तारांकित तर १६० अतारांकित प्रश्‍नांना विविध मंत्री उत्तरे देतात. 

भारतीय संसदेत १८९२ पासूनची परंपरा असलेल्या प्रश्‍नोत्तर तासाची परंपरा १९५० नंतर अपवादात्मक परिस्थितीतच खंडीत झाली आहे. प्रश्‍नोत्तराच्या तासात ज्या मंत्रालयांचे प्रश्‍न असतील त्यांचेच अतारंकित प्रश्‍न असावेत ही संसदीय परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे प्रश्‍नोत्तराचा अख्खा तासच रद्द केल्याने विरोधक खवळले होते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या