प्रजासत्ताक दिनी राजपथवर झेपावणार 'राफेल' 

Copy of Gomantak Banner  (14).jpg
Copy of Gomantak Banner (14).jpg

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेड मध्ये मागील वर्षी भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या राफेल विमानांचा समावेश असणार आहे. प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या फ्लायपास्ट मध्ये राफेल विमान हवेत झेप घेतानाचे दृश्य पाहायला मिळणार आहे. फ्लायपास्टच्या शेवटी राफेल विमान वर्टिकल चार्ली फॉरमेशनमध्ये दिसणार असल्याचे हवाई दलातील विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी आज सांगितले. 

हवाई दलाच्या एकूण 38 विमानांचा समावेश यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये असणार आहे. याव्यतिरिक्त चार विमाने भारतीय सैन्य दलाची हवेत झेप घेताना दिसणार आहेत. मात्र या सर्वांमध्ये राफेल विमान हे सर्वांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. कारण राफेल हे प्रगत पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. व मागील वर्षी फ्रान्स मधून आठ विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली होती. तर भारताने फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशनकडून 36 राफेल विमाने खरेदी केलेली आहेत. यासाठी भारताने 59000 कोटी रुपयांचा करार डेसॉल्ट एव्हिएशनशी केला होता. व पुढील दोन वर्षात ही विमाने भारतीय वायूसेनेत दाखल होणार आहेत. या विमानांच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार आहे. 

राफेल लढाऊ विमान हे मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाण्याची या विमानाची क्षमता आहे. हे विमान स्काल्प, मिटीयॉर अशा बियॉंड व्हिजुअल रेंजच्या मिसाइलने शस्त्रसज्ज आहे. स्काल्प मिसाईल हे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असून, याची रेंज 300 किलोमीटर आहे. त्याशिवाय राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.         


          

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com