'RSS-BJP ने स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, सावरकरांना ब्रिटिशांकडून...': Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या 'भारत जोडो' यात्रेदरम्यान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

Rahul Gandhi On BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या 'भारत जोडो' यात्रेदरम्यान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या ताज्या वक्तव्यात राहुल गांधी म्हणाले की, 'महात्मा गांधी आणि नेहरुंनी देश स्वतंत्र केला, पण माझी विचारसरणी सांगते की, RSS आणि सावरकर स्वातंत्र्यलढ्यात कुठेच नव्हते.'

द्वेष आणि हिंसा पसरवणे देशविरोधी काम

भाजपवर (BJP) टीका करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, "मला वाटते की द्वेष पसरवणारी व्यक्ती कोण आहे, याने कुठेही फरक पडत नाही, द्वेष करणारे कोणत्या समुदायाचे आहेत, यानेही काही फरक पडत नाही, परंतु सत्य हे आहे की, द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. म्हणूनच अशा लोकांविरुद्ध आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी लढू.''

Rahul Gandhi
महागाई अन् बेरोजगारीवरुन काँग्रेस आक्रमक; प्रियंकासह, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

RSS-सावरकरांवर राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

संघ परिवारावर हल्लाबोल करताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'माझ्या समजुतीनुसार संघ इंग्रजांना मदत करत होता आणि सावरकरांना ब्रिटिशांकडून स्टायपंड मिळत होता. स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेच नव्हता. भाजप ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. काँग्रेस (Congress) आणि त्यांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला हे सत्य आहे.'

Rahul Gandhi
राहुल गांधी ED केसचे पडसाद गोव्यात; GPCC अध्यक्षांसह कार्यकर्ते ताब्यात

भारत जोडो यात्रेला देशाचा पाठिंबा

शेवटी राहुल गांधी म्हणाले की, 'एकटा भाजप देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहे. याच कारणामुळे आम्हाला भारत जोडो यात्रा काढावी लागली. या प्रवासात मी एकटा नाही. या यात्रेत लाखो भारतीय येत आहेत.' राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे फोटो व्हायरल होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com