'जो नफ़रत करे,वह योगी कैसा!' राहुल गांधींचा योगींवर घणाघात

हुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना लक्ष्य करत जोरदार निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi Attacks On Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath
Rahul Gandhi Attacks On Uttar Pradesh Chief Minister Yogi AdityanathDainik Gomantak

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) आधी देशातील सर्वच पक्षांमध्ये खळबळ स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर आज काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना लक्ष्य करत जोरदार निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi Attacks On Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath)

राहुल गांधींनी ट्विट , "जो द्वेष करतो, तो योगी कसा आहे!" असे ट्विट करत राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. यापूर्वी काल देखील राहुल गांधींनी हिंदू-मुस्लिमांशी संबंधित एक ट्विट शेअर केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की , 'तुम्ही हिंदू शीख ख्रिश्चन किंवा मुस्लिमांचे नसून तुम्ही फक्त तुमच्या मित्रांचे आहात .' मात्र, या ट्विटमध्ये त्यांनी कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य केले नव्हते. पण त्यांचा रोख नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.

दुसरीकडे, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांच्या लखनौमध्ये तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान अनेक बैठकांनंतर, पक्षाने २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दावेदारांकडून अर्ज घेणे सुरू केले आहे.काँग्रेस मुख्यालयातून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, 2022 ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांकडून तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसने अर्ज घेणे सुरू केले आहे.

Rahul Gandhi Attacks On Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath
मास्कपासून सुटका नाहीच; देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका: निती आयोग

दुसरीकडे, काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यूपी निवडणुकीच्या संदर्भात राज्य दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत काँग्रेसमधील अंतर्गत चर्चा जोरात आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, यूपीच्या निवडणुका प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com