हल्याळ येथे राहुल गांधीचा वाढदिवस साजरा

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

यावेळी देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावताना पूर्व लडाख येथील सीमेलगत असलेल्या गलवान खोऱ्यात चीन विरुद्ध झालेल्या धुमचक्रीत शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.  

हल्याळ

हल्याळ येथे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हल्याळ तालुका काँगेस पक्षाच्या वतीने  बाजारपेठ येथील काँग्रेस कार्यलयात राहुल गांधी याचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी  शहरातील काँग्रेस नेत्यांनी  तालुका इस्पितळात जाऊन रूग्णांना फळ वाटप केले.
यावेळी देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावताना पूर्व लडाख येथील सीमेलगत असलेल्या गलवान खोऱ्यात चीन विरुद्ध झालेल्या धुमचक्रीत शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.  
कारवार जिल्हा पंचायत उपाध्यक्ष संतोष रेणके, हल्याळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष कोरवेकर,  कारवार जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा पाटील, नगरसेवक फय्याज शेख, नुसरातजहाँ बसापूर, सुवर्ण मादार, नेते सत्यजित गिरी, संजू मिशाळी बाबू मिराशी, संतोष हुंडेकर, हल्याळ महिला काँग्रेस तालुकाअध्यक्ष माला ब्रांगाझा, डॉ अरुण हलगट्टी व अन्य यावेळी उपस्थित होते.
कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि हल्याळ-जोयडा मतदारसंघाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. 

संबंधित बातम्या