'भारताची स्थिती श्रीलंकेसारखीच', राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थव्यवस्थेवरील ट्विटमध्ये केंद्र सरकारवर हल्ला चढवला.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेवरील ट्विटमध्ये केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी भारताची तुलना थेट श्रीलंकेशी केली. ज्यामध्ये बेरोजगारी, इंधनाचे दर आणि जातीय हिंसाचारात दोन्ही देशांचा आलेख जवळपास सारखाच दिसत होता. राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये सहा ग्राफिक्स शेअर केले आहेत, ज्यात तीन भारताचे आणि तीन श्रीलंकेचे आहेत. त्यांनी लिहिले, 'लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारत श्रीलंकेसारखा दिसतो.' (Rahul Gandhi Compared India To Crisis Hit Sri Lanka)

दरम्यान, आलेख 2017 पासून दोन्ही देशांतील बेरोजगारी दर्शवितो, जी 2020 मध्ये शिखरावर होती. 2022 मध्येच भारतात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. 2021 मध्ये बेरोजगारीच्या या परिस्थितीत काही सुधारणा दिसून येईल.

Rahul Gandhi
'...राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका झाली': काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

तसेच, दुसरा आलेख भारत आणि श्रीलंकेतील (Sri Lanka) पेट्रोलच्या किमतींची तुलना करतो. या किमती 2017 पासून वाढत आहेत आणि 2021 मध्ये शिखरावर आहे.

दुसरीकडे, तिसर्‍या आलेखामध्ये दोन्ही देशांतील जातीय हिंसाचार आलेखाद्वारे दाखविण्यात आला असून, 2020-21 मध्ये दोन्ही देशांमध्ये त्याचा आलेख उंचावला आहे. या पोस्टमधील डेटा आर्म्‍ड कनफ्लिक्‍ट लोकेशन एंड इवेंट डेटा प्रोजेक्‍ट, लोकसभा अनस्‍टार्ड क्‍वेश्‍चंस, सीएमआईई, प्‍लानिंग एंड एनालिसिसि सेट, सेंट्रल बैंक ऑफ श्रीलंका आणि CEYPETCO (Ceylon Petroleum Corporation) च्या हवाल्याने देण्यात आला आहे.

Rahul Gandhi
"पंतप्रधान मोदी जबाबदारी झटकतात"; राहुल गांधींसह ममतांचा सरकारवर हल्लाबोल

विशेष म्हणजे, श्रीलंका सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या देशात अन्न, वीज आणि इंधनाची तीव्र टंचाई आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन आणि लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग ठप्प झाला. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती बिकट बनली. श्रीलंका सरकारने बुधवारी सांगितले की, 'पेट्रोलने भरलेले जहाज जवळपास दोन महिन्यांपासून कोलंबोच्या किनाऱ्यावर उभी आहेत, परंतु आमच्याकडे पैसे देण्यासाठी परकीय चलन नाही.' श्रीलंकेने आपल्या नागरिकांना (Citizens) या इंधनासाठी "रांगेत उभे राहून वाट पाहू नका" असे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com