देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
Rahul Gandhi and Narendra Modi

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली आल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे मोदी सरकारवर नेहमीच हल्ले करणारे कॉंग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 17-18 पैसे कमी केल्या आहेत. यावर राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरताना पाच राज्यांमधील आगामी निडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने इंधनाच्या किमती कमी केल्या असल्याचे म्हटले आहे. (Rahul Gandhi criticized Modi government after lowering petrol and diesel prices in the country)

पेट्रेल आणि डिझेलच्या किमती मागील काही दिवसांपासून चांगल्याच वाढल्या आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी आवाज उठवत केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र त्यानंतर आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे भाव घटल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील 17-18 पैशांनी कमी झाल्या. यावर आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना, आगामी विधानसभेला समोर ठेवून केंद्र सरकराने पेट्रेल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या असल्याचे म्हटले आहे. 

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सोशल मीडियाच्या ट्विटर वरून टीका करताना, निवडणुकीमुळे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल 17/18 पैसे प्रतिलिटर स्वस्त केले असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, आता 17/18 पैशांची बचत होणार असल्यामुळे या रकमेचे तुम्ही काय काय कराल? असा खोचक सवाल देखील त्यांनी आपल्या ट्विट मधून जनतेला विचारला आहे. 

दरम्यान, देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडत आहेत. यानंतर, देशातील चारही महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 90.78 रुपये तर डिझेलची किंमत 81.10 रुपये प्रतिलिटर आहे. आणि चारही मेट्रो शहरांपैकी मुंबईत अजूनही पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर आहेत. मुंबईत पेट्रोल 97.19 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.20 प्रति लिटर आहे.   

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com