परदेशी लसीच्या आयातीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

rahul gandhi vaccine.jpg
rahul gandhi vaccine.jpg

देशात सध्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच देशात रेमेडीसीव्हीर इंजेक्शन तसेच लसींची कमतरता भासताना दिसते आहे. याच परिस्थितीशी लढण्यासाठी केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत राहुल गांधी यांनी 'आपण या गोष्टीबद्दल सरकारकडे आधीच मागणी केली होती' याची आठवण करून दिली असल्याचे पाहायला आहे.(Rahul Gandhi criticizes central government over import of foreign vaccines)

महीलेने कार चालवताना मोबाईलवर कोरोना रिपोर्ट पहिला आणि घडला अनर्थ
  
कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी परदेशी लसींना जलदगतीने परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर यावेळी राहुल गांधींनी टीका केली आहे. आपण आधी परदेशी लस आयात करण्याची मागणी केली होती, परंतु या मागणीला नाकारत केंद्रीय मंत्र्यांनी आपली ही मागणी धुडकावून लावली होती असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले. या ट्विट मध्ये 'आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि अखेरीस तुम्ही विजयी व्हाल' असे लिहीत केंद्र सरकारला जोरदार चपरख लगावलेली पाहायला मिळते आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने रशियन कोरोना लस स्पुटनिक व्ही च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त, देशातील लसींचे उपलब्धता वाढविण्यासाठी आणि देशातील लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी अधिकृत, परदेशी निर्मित कोविड लस मंजूर करण्याची प्रक्रिया देखील वेगाने होताना दिसते आहे. परदेशी निर्मित लसींच्या पहिल्या 100 लाभार्थ्यांच्या आरोग्यावर सात दिवस लक्ष ठेवले जाईल आणि त्यानंतर या लसींचा वापर देशात लसीकरण कार्यक्रमात केला जाईल, असे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com