पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे आहे ते समजत नाही

कृषी कायदा शेतकऱ्यांनी, नोटाबंदी अर्थतज्ज्ञांनी, आणि जीएसटी व्यापाऱ्यांनी नाकारला
पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे आहे ते समजत नाही
Rahul Gandhi Dainik Gomantak

केंद्र सरकारने घेतलेले अनेक निर्णय केंद्राला कसे मागे घ्यावे लागले. याबद्दल काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे आहे. ते समजत नाही कारण त्यांना त्यांच्या 'मित्रांच्या' आवाजाशिवाय दुसरे काहीही ऐकू येत नाही. असा टोला ही गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. (Congress leader Rahul Gandhi criticizes Modi government )

Rahul Gandhi
लष्करप्रमुखांची घोषणा, अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रिया दोन दिवसांत होणार सुरु

याबाबत राहूल गांधी म्हणाले की, अग्निपथ योजना देशातील तरुणांनी नाकारली आहे. कृषी कायदा देशातील शेतकऱ्यांनी नाकारला आहे. नोटाबंदीचा निर्णय अर्थतज्ज्ञांनी नाकारला आहे. तसेच जीएसटीने घेतलेला निर्णय ही व्यापाऱ्यांनी नाकारला आहे. मोदी सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला. प्रत्येक मुद्यावरुन देशात मोठे वादंग उठले होते. अग्निपथ योजना केंद्राने जाहीर केली आणि देशातील अनेक राज्यात युवकांनी याला विरोध दर्शवण्यासाठी निर्दशने सुरु केली आहेत. या निदर्शनात अनेक ठिकाणी जमाव हिंसक झाल्याचं संपुर्ण देशाने पाहीले आहे.

Rahul Gandhi
Agnipath Scheme Protest: सिकंदराबादमध्ये 1 ठार, 15 हून अधिक जखमी

भाजप सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले होते. याला विरोध करताना लाखो शेतकऱ्यांनी देशभरात संताप व्यक्त केला होता. या काही वेळा हिंसक निदर्शने ही झाली होती. संसदेत ही वादविवाद आणि चर्चेच्या अभावाने ते रद्द केले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com