Rahul Gandhi Truck Ride Video: राहुल गांधींनी ट्रकमधून केला प्रवास, व्हिडिओ तुफान व्हायरल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रक चालवतांना दिसले आहे.
Rahul Gandhi Truck Ride Video:
Rahul Gandhi Truck Ride Video:Dainik Gomantak

Rahul Gandhi Video: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रकमधून प्रवास करतांना दिसले आहे. राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने त्यांनी प्रवास केला. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल ट्रकमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा व्हिडिओ (Video) रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर राहुलचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Rahul Gandhi Truck Ride Video:
New Parliament Inauguration: नव्या संसद भवन उद्धाटनावरून भाजप अन् विरोधकांमध्ये जुंपली!

याआधी राहुल गांधी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करू नये, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. 

नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे. नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीदिनी 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 28 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत माहिती दिली होती.

  • राहुलने भारत जोडो यात्रा काढली होती

यापूर्वी राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला. ही यात्रा 12 राज्यांतून गेली आणि जानेवारीत जम्मू-काश्मीरमध्ये संपली. 136 दिवसांच्या या प्रवासात राहुलने 4000 किलोमीटरहून अधिक अंतर कापले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com